हु. आण्णाराम गोंडा पाटील शाळेजवळ गटारीची समस्या, स्वच्छता कामगार तोंड बांधून कामाला. व्हिडीओ-https://youtube.com/shorts/3dt915XXkSc?si=B8Ix6E8mlRy01pBA
इचलकरंजी
हु. आण्णाराम गोंडा पाटील शाळेजवळील परिसरात प्रसारित झालेल्या व्हिडीओनंतर अखेर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठा कर्मचारी वर्ग लावून स्वच्छतेला सुरुवात केली. मात्र, गटारीतून येणारा सांडपाणी व मैला बॅक मारत असल्याने प्रचंड दुर्गंधी व दलदल निर्माण झाली असून कर्मचारी यांना तोंड बांधून काम करावे लागत आहे.
या गटारीच्या अस्वच्छतेचा फटका परिसरातील नागरिकांबरोबरच लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आरोग्यावरही होत आहे. आरोग्य विभागाने तत्परतेने काम सुरू केले असले तरी बांधकाम विभागाने गटारीचे मूलभूत काम मार्गी लावले नसल्याने समस्या कायम आहे.
दरम्यान, भाजी विक्रेत्यांना उरलेला वेस्टेज भाजीपाला टाकण्यासाठी स्वतंत्र सोय उपलब्ध करून दिली नाही, त्यामुळे गटारीतच हा कचरा टाकला जातो आणि समस्या अधिकच गंभीर बनते. स्थानिक नागरिकांनी तातडीने गटारीचे बांधकाम पूर्ण करण्याची व भाजी कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यावश्यक ठरले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







