जोडी तुझी माझी स्पर्धेत मेघा उत्तुरे व कोमल शिंदे प्रथम
इचलकरंजी
इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ अंतर्गत आयोजित जोडी तुझी माझी या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्य स्पर्धेत मेघा उत्तुरे व कोमल शिंदे (प्रथम) या जोडीने अव्वल स्थान मिळविले. विशेष म्हणजे या स्पर्धेत नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण अशा तब्बल ४७ जोड्या सहभागी झाल्या होत्या. तर सायंकाळच्या सत्रात गोल्डन मेलोडीज द ग्रँड म्युझिकल नाईट कार्यक्रमात हिंदी, मराठी गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध होऊन गेले.
या अनोख्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या पारंपरिक वेशभूषेसह स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ श्रींची महाआरती व मारवाडी युवा मंच मिडटाऊन अध्यक्षा सौ. अनिता जैन व कोषाध्यक्ष सरीता तिवारी व भाजपा जिल्हा सरचिटणीस रमा फाटक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. तर शाहीर संजय जाधव यांनी गणेश वंदना सादर केली.
Advt
स्पर्धेत सहभागी सर्वच जोड्यांनी गाणी, मिमिक्री, नृत्य, नाटक असे सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळविली. स्पर्धेत परिक्षक म्हणून सलोनी कबाडे आणि अर्पिता रबाडे यांनी काम पाहिले. स्पर्धेत मेघा उत्तुरे व कोमल शिंदे (प्रथम), स्वरा बिरांजे व तन्वी काटकर (द्वितीय), रिध्दी सुतार व अमृता बारवाडे (तृतीय), निशांत सावंत व देवेश व्यास (उत्तेजनार्थ), दर्शन लड्डा व सिध्दी भंडारी (उत्तेजनार्थ) यांनी यश मिळविले. याप्रसंगी गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सुर्यवंशी, सपना भिसे, सीमा कमते, अर्चना कुडचे, नजमा शेख, नागुवाई लोंढे, रंजना डावरे, पुनम जाधव व संगीता साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तर सायंकाळच्या सत्रात गोल्डन मेलोडीज द ग्रँड म्युझिकल नाईट हा हिंदी, मराठी गीतांचा सुरेल असा गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ पोलिस उपअधिक्षक विक्रांत गावकवाड यांच्या हस्ते महाआरती तसेच गावभाग ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश चव्हाण, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि प्रशांत निशाणदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. जुन्या काळापासून ते आतापर्यंतच्या गीतापर्यंत प्रशांत होगाडे, नीता ठाकूर-देसाई, प्रविण होगाडे, डॉ. दीपक कुंभार, महेश शिंदे या सर्वच कलाकारांनी आपल्या अदाकारीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संगीत संयोजन विक्रम पाटील यांच्यासह ऋतिक कुरणे, गणेश साळोखे, चंद्रकांत घारुंगे, सर्जेराव कांबळे, स्नेहल जाधव, प्रकाश साळोखे यांची संगीत साथ लाभली. तर स्वप्निल पन्हाळकर यांनी सुरेख निवेदन केले. याप्रसंगी अहमद मुजावर, शेखर शहा, संग्राम सटाले, सौरभ पाटील, मुञ्जमिल सय्यद, सप्रेम पटेकरी, महादेव लवटे, सत्येन राजमाने उपस्थित होते.
स्पर्धेतील विविध क्षण,
शुभारंभ करताना अनिता जैन,सरिता तिवारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








