इचलकरंजी महापालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड प्रक्रिया पारदर्शक व काटेकोर पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. या निवडीसाठी केंद्रनिहाय चार समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. प्राथमिक समित्यांनी केलेल्या मूल्यमापनानंतर वरिष्ठ समितीकडे अंतिम शिफारसी सादर करण्यात आल्या. वरिष्ठ समितीने सर्व निकषांचा सखोल आढावा घेऊन आदर्श शिक्षकांची अंतिम निवड केली.
Advt
महानगरपालिका शिक्षण विभाग दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराद्वारे करतो. या सन्मानाचा उद्देश शिक्षकांना प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांच्या घडणीत तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत अधिक योगदान देण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मानकरी – २०२५-२६ साठी महानगरपालिका शाळा विभागातून – सौ. मनीषा सुधीर डिग्रजे, रवींद्रनाथ टागोर विद्या निकेतन शाळा क्र. २७, इचलकरंजी.
खाजगी प्राथमिक अनुदानित विभागातून – सौ. लता बाळासो नाईक, माई विद्या मंदिर, इचलकरंजी. यांची निवड करण्यात आली
निवड प्रक्रियेत शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली कामगिरी, नवोपक्रम, सामाजिक उपक्रमातील सहभाग तसेच शाळेच्या प्रगतीत दिलेले योगदान या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे (कोल्हे) यांनी सांगितले की, “शिक्षकांचा सन्मान करणे हेच समाजाच्या विकासाचे बळ आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.”
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







