इमनपा निवडणुकीसाठी
२३७ उमेदवारी अर्जांची विक्री; एकूण विक्री ९२३ वर, २ अर्ज दाखल
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका मिडिया व संपर्क व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी विविध प्रभाग समिती कार्यालयांत उमेदवारी अर्जांची उत्साहवर्धक विक्री झाली. प्रभाग समिती कार्यालय अ मध्ये ४६, ब मध्ये ४२, क मध्ये ८१ तर ड मध्ये ६८ अर्जांची विक्री झाली. अशा प्रकारे केवळ आजच्या दिवसात एकूण २३७ उमेदवारी अर्जांची विक्री नोंदविण्यात आली.
निवडणूक जाहीर झाल्यापासून आज दि. २७ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी पाहता, आतापर्यंत एकूण ९२३ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आज एकूण २ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी प्रभाग क्रमांक ६ मध्ये १ अर्ज आणि प्रभाग क्रमांक ९ मध्ये १ अर्ज दाखल झाला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







