इमनपा ईव्हीएम कमिशनिंगचे काम यशस्वीरीत्या पूर्ण
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निवडणूक कामकाज युद्धपातळीवर सुरू असून, ईव्हीएम (EVM) कमिशनिंगची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. ८ जानेवारी व शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे ईव्हीएम कमिशनिंगचे काम पार पडले. या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण (ए झोन), बाबासाहेब वाघमोडे (बी झोन), ओमप्रकाश यादव (सी झोन) आणि जयवंत उगले (डी झोन) यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यात आले.
या दरम्यान आयुक्त पल्लवी पाटील तसेच सहायक निवडणूक निरीक्षक जीवन गलांडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ईव्हीएम कमिशनिंगच्या कामकाजाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी ईव्हीएम कमिशनिंगचे काम पूर्ण झाले असून, तयार झालेल्या ईव्हीएम राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
स्ट्रॉंग रूमसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण राजीव गांधी सांस्कृतिक भवन परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवण्यात येणार आहे.
या प्रक्रियेसाठी सर्व झोनचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, झोनल अधिकारी, सुमारे २५० अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









