ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत.

इचलकरंजी
कुरुंदवाड येथील वीज वितरण कंपनीकडून मजरेवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडित होणार असल्याने मजरेवाडी येथील पाणी उपसा बंद राहणार आहे. तसेच पंचगंगा पाणीपुरवठा योजनेच्या दाबनलिकेला डेक्कन जॅकवेलजवळ गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कारणांमुळे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर टारे कॉर्नर ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान ७५० मिमी व्यासाच्या पाइपलाईन जोडणीचे कामही करण्यात येणार असून हे काम मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळपर्यंत पूर्ण होणार आहे.
दरम्यान शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न