ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त; एकास अटक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त; एकास अटक

व्हिडीओ-https://youtube.com/shorts/AquK-fmyi8k?si=lU_gjoGiKgRgYTiN

इचलकरंजी:
इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्ट कारवाई करत नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करून एकास अटक केली आहे. पंचगंगा नदी स्मशानघाटाजवळ ही कारवाई करण्यात आली.
 २६ जानेवारी रोजी सायंकाळी पंचगंगा नदी स्मशानघाटाजवळील रस्त्यावर संशयित इसम नशेची इंजेक्शने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून संशयित समर्थ दत्तात्रय चौगुले (वय १९, रा. विवेकानंद नगर, कोरोची; सध्या रा. शिवाजीनगर, कोरोची, ता. हातकणंगले) यास ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून MEPHENTERMINE SULPHATE INJECTION या प्रतिबंधित औषधाच्या एकूण १०० बाटल्या, एक दुचाकी व मोबाईल असा एकूण ६३,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पो.स.ई. गोविंद कोळेकर, पो.हे.कॉ. उदय करडे, अनिल पाटील, अमर शिरढोणे, विजय माळवदे, राम पाटील, सुरज चव्हाण आदी अधिकारी व अंमलदार सहभागी होते. पुढील तपास पो.स.ई. गोविंद कोळेकर करीत आहेत.

नशेच्या औषधी बाटल्यासह आरोपीस ताब्यात घेताना इचलकरंजी पोलीस

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा