ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महापालिकेची महापौर-उपमहापौर निवडणुक जाहीर,९ फेब्रुवारीला विशेष सभा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महापालिकेची महापौर-उपमहापौर निवडणुक जाहीर,९ फेब्रुवारीला विशेष सभा

इचलकरंजी –
 इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून ही सभा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
महानगरपालिका आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार ही विशेष सभा घेण्यात येत असून, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच महापौर व उपमहापौर निवडणूक नियम २००५, २००६ व २०१० मधील तरतुदीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
या विशेष सभेसाठी कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीचे संपूर्ण कामकाज कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करून पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाची प्रत आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका तसेच नगर सचिव यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीमुळे शहराच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुकांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा