मंगळवारी प्रबोधिनीत ‘ नाट्यानुभव ‘ रंगणार
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त प्रहसन, स्वगत, काव्यनाट्य यांचा विचारप्रवृत्त करणारा विनोदी आणि मर्मभेदी असा अनोखा आविष्कार दर्शविणारा ” नाट्यानुभव” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा नाट्यानुभव ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मिलिंद दांडेकर आणि अरुण दळवी हे सादर करणार आहेत. अरुण दळवी लिखित ‘ मरणोत्तर ‘हे प्रहसन ,’गुड बाय डॉक्टर ‘या नाटकातील स्वगत आणि विनोदी प्रसंग ,तसेच वसंत बापट यांच्या ‘ फुंकर ‘ या कवितेचे मर्मभेदी सादरीकरण या नाट्यानुभवात होणार आहे. मंगळवार ता.०३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं.६ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला इचलकरंजी व परिसरातील साहित्य,नाट्य, काव्यसिकांनी यावे असे आवाहन प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







