ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्रांचे वितरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्रांचे वितरण

इचलकरंजी
पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ नुसार इचलकरंजी शहरातील अधिकृत पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्रांचे वितरण करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिका तळमजल्यावरील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ८४२ अधिकृत पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रारंभी पहिल्या दहा पथविक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते विक्री प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना पथविक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोल्हे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, प्रभारी सहाय्यक आयुक्त श्रीकांत पाटील, धनंजय पळसुले यांच्यासह पथविक्रेता समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील उर्वरित पथविक्रेत्यांनी महानगरपालिकेकडून निश्चित केलेले शुल्क भरून आपली विक्री प्रमाणपत्रे लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेला कायदेशीर संरक्षण मिळून त्यांना अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने व्यवसाय करता येणार आहे.
पथविक्रेत्याना नोंदणी प्रमाणपत्र वितरण करताना उपायुक विद्या कदम,अति आयुक्त सुषमा शिंदे,महापौर उदय धातूंडे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा