कन्या महाविद्यालयात ‘बँकिंग क्षेत्रातील करियर संधी’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात अग्रणी योजनेअंतर्गत ‘बँकिंग क्षेत्रातील करिअर संधी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अर्थशास्त्र विभागाने केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) त्रिशला कदम यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. सोमनाथ काळे (अर्थशास्त्र, विभाग प्रमुख) यांनी करून दिली. प्रथम सत्रात डॉ. कैलास पाटील (अर्थशास्त्र विभागप्रमुख, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर) यांनी करिअरचा अर्थ, बँकिंग क्षेत्रातील विविध पदांची, या पदांच्या कार्याची, यासाठी दिले जाणारे वेतन याबाबतची सविस्तर माहिती ओघवत्या शैलीत विद्यार्थिनींना दिली.
दुसऱ्या सत्रातील मार्गदर्शक प्रा. अभिषेक चौगले (राज्यशास्त्र विभागप्रमुख, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज) यांनी बँका तसेच इतर वित्तीय संस्थांमध्ये विविध पदावरील अधिकारी व कर्मचारी यांची निवड प्रक्रिया, पात्रता, परीक्षेचे स्वरूप व या परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी प्रथम सत्रासाठी डॉ. विठ्ठल नाईक (हिंदी विभागप्रमुख व अग्रणी महाविद्यालय समिती प्रमुख) सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर द्वितीय सत्रासाठी प्रा. प्रियांका साळोखे (कॉमर्स विभागप्रमुख) सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता बडे व प्रा. शाहीन फकीर यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रा.सुधाकर इंडी, प्रा. उदय कांबळे, प्रा. शिवशंकर रत्नपारखे, डॉ. धीरज शिंदे, डॉ. अशोक बोगुलवार, प्रा. प्रिया सुतार, प्रा. नागरथवार, तसेच चंद्राबाई शेंदुरे कॉलेज,हुपरी, राजर्षी शाहू आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज रुकडी, अण्णासाहेब डांगे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज हातकणंगले, डी के एस सी कॉलेज इचलकरंजी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज पेठ वडगाव, विजयसिंह यादव कॉलेज पेठवडगाव, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी येथील प्राध्यापक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
प्रा. संभाजी निकम (सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र) यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
मार्गदर्शन करताना कैलास पाटील
—