शिवछत्रपती काळाच्या पुढे पाहणारे द्रष्टे राजे
इचलकरंजी:
छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श लोकराजे होते. राजा असूनही लोकशाही पद्धतीने त्यांनी कारभार केला. साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांनी सर्वांगीण समतेची भूमिका घेत आपल्या राज्यकारभारातून समाजातल्या शेवटच्या माणसाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. तसेच रयतेचे राज्य प्रस्थापित करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांचा निपा:त केला.हे त्यांचे अतिशय मोलाचे कार्य आहे. काळाच्या पुढे जाणारे द्रष्टे राजे म्हणून जगाच्या इतिहासात शिवाजीराजांची नोंद आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून शहीद गोविंद पानसरेयांच्या पर्यंत अभ्यासकांनी शिवछत्रपतींच्या जीवनकार्याचा घेतलेला शोध आणि बोध ध्यानात घेऊन शिवछत्रपतींचा खरा आदर्श सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमामध्ये बोलत होते. प्रारंभी शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पांडुरंग पिसे व महेंद्र इनामदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अन्वर पटेल, विनोद जाधव ,योगेश सुधाळ ,सागर भिसे, अक्षय धोत्रे आधी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







