आपटे वाचन मंदिरमध्ये जागतिक महिला दिन संपन्न.
इचलकरंजी,
आपटे वाचन मंदिर व श्री. स. सौ. गंगामाई महिलालय, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. ज्योती जाधव, मा. प्रभारी- प्र. कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सौ. मीना रानडे-अध्यक्ष-गंगामाई महिलालय व प्रास्ताविक सौ. सुषमा दातार-अध्यक्ष-आपटे वाचन मंदिर यांनी केले. या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार मीना रानडे व सुषमा दातार यांचे हस्ते करण्यात आला. मा. ॲड . जिया शेख (आयर्न वुमन), मा. श्रद्धा गोडसे (महिला कीर्तनकार), मा. अँड प्रीती पटवा (विधी शैक्षणिक मार्गदर्शन), मा. सुषमा पाटील (व्यवसायिक), मा. शैलजा शिंदे (संचालक, श्रेय केअर सेंटर), मा. आसावरी सातपुते (वृद्धाश्रम, चोकाक) अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ . ज्योती जाधव यांनी महिलांनी आपल्या आयुष्यात कर्तुत्व व मातृत्व दोन्हीही गोष्टी सांभाळून कार्य करावे असा संदेश त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला. आभार अश्विनी मराठे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. प्रा . सुजित व सौ.पूर्वा सौंदत्तीकर यांनी केले. या कार्यक्रमास दोन्हीही संस्थांचे पदाधिकारी, संचालक, पत्रकार, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







