ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे व्यावसायिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे व्यावसायिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

इचलकरंजी :
भारताने संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाचा ध्यास घेत आज जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकेकाळी शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून असलेला भारत आज संरक्षण साहित्याची निर्यात करणारा देश बनला आहे. उद्योजकांनीही संरक्षण उत्पादन क्षेत्रात पुढे येऊन देशाच्या आत्मनिर्भरतेत योगदान द्यावे, असे आवाहन संरक्षण संशोधन क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांनी केले.
रोटरी क्लबच्या वतीने आयोजित रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार(रोटरी व्होकेशनल  अवार्ड )वितरण समारंभात प्रमुख पाहुणे तसेच संरक्षण, विज्ञान व नेतृत्व या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते  बोलत होते. कार्यक्रमास रोटरी प्रांत ३१७० चे उपप्रांतपाल सुदर्शन कदम , व्होकेशनल सर्विस डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यतीराज भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. देवधर यांनी कारगिल युद्धातील शस्त्रास्त्रांच्या वापराबाबत अनुभव सांगताना अनेक किस्से मांडले. सैन्याचा आत्मविश्वास वाढवणे हे संशोधन संस्थांसाठी मोठे काम असल्याचे सांगून त्यांनी ८४ मिमी लाइट वेट लाँचरसारख्या शस्त्रांच्या चाचण्यांमधील अनुभवही सांगितले. नेतृत्व करताना धोका पत्करून पुढे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले. येत्या काळात भारत ‘विश्वगुरू’ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार विजय रामचंद्र मेटे (टेक्स्टाईल प्रोसेसिंग), सौ. स्वाती अश्विन कुराडे (इलेक्ट्रिकल क्षेत्र),  विवेक चंद्रकांत हासबे (कॉम्प्युटर सेल्स व सर्व्हिस), जयदत्त अॅल्युमिनियम प्रा. लि. श्री दत्तात्रय उघडे (अॅल्युमिनियम व ग्लास वर्क) आणि लघु उद्योग भारती (संस्था) यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय घायतिडक यांनी स्वागत केले. प्रास्ताविक कमिटी चेअरमन सुनील यळरुटे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख महेश दाते यांनी करून दिली. रोटरी उपप्रांतपाल सुदर्शन कदम व व्होकेशनल सर्व्हिस डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यतीराज भंडारी यांनी  मनोगत व्यक्त केले. बुलेटीन एडिटर नितीन भागवत यांनी प्रकाशित केलेल्या रोटरीच्या ॲक्शन बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कल्याणी दाभाडे या विद्यार्थिनीला सायकल प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन सौ. शर्मिला पाटील यांनी केले तर आभार सागर पाटील यांनी मानले. यावेळी प्रकाश गौड, नेमिनाथ कोथळे, रवींद्र नाकील, संजय खोत, मुकुंद माळी, मुकेश जैन, अभय यळरुटे यांच्यासह निमंत्रित,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी व्यावसायिक पुरस्कार वितरण समारंभ वेळी पाहुणे डॉ. काशिनाथ देवधर रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक, सेक्रेटरी पाटील, सुदर्शन कदम, सुनील येळरूटे ,महेश दाते, सागर पाटील व पुरस्कार प्राप्त व्यक्ती
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा