इचलकरंजी महापालिकेचे २०२६–२७ चे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेचे सन २०२६–२०२७ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे सादर केले आहे.
इचलकरंजी नगरपरिषदेचे जून २०२२ मध्ये महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर मागील तीन वर्षे प्रशासनाकडूनच वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यात येत होते. यावर्षी मात्र जानेवारी महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडून लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले आहे. तसेच सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या लेखा विभागाने तयार केलेले सन २०२६–२०२७ या वर्षाचे अंदाजपत्रक तसेच सन २०२५–२०२६ या वर्षाचे दुरुस्त अंदाजपत्रक आयुक्त पल्लवी पाटील यांनी दि. ९ मार्च रोजी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे सादर केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहाय्यक लेखाधिकारी रामचंद्र कांबळे व चंद्रकांत लोखंडे उपस्थित होते.
दरम्यान, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी गुरुवार, दि. १२ मार्च रोजी सन २०२६–२०२७ च्या अंदाजपत्रकावर विचारविनिमय करण्यासाठी स्थायी समितीची बैठक आयोजित केली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे अंदाजपत्रक पुढील मंजुरीसाठी महासभेकडे पाठविण्यात येणार आहे.
सभापती सतीश मुळीक यांच्याकडे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







