ICHMH51NEWS.IN
9921600800

“दत्ताजीराव कदम ए. एस. सी. महाविद्यालयात संशोधन पेपर व प्रकल्प लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न”

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“दत्ताजीराव कदम ए. एस. सी. महाविद्यालयात संशोधन पेपर व प्रकल्प लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न”

इचलकरंजी
येथील डीकेएएससी महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभागाच्या वतीने संशोधन पेपर व प्रकल्प लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा हि दोन सत्रांत संपन्न झाली. प्रथम सत्रात प्रमुख व्याख्याते डॉ. अभिजित पाटील यांनी संशोधन प्रकल्प लेखन या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यात त्यांनी संशोधन करत असताना विषय निवड, समस्या निश्चिती, गृहीतक, साहित्य समीक्षा, संशोधन पद्धती, निष्कर्ष, शिफारशी इत्यादी बाबींचा विचार करणे गरजेचे आहे तरच संशोधनाचा आवाका समजण्यास मदत होईल असे मत मांडले.
त्याचबरोबर समाजशास्त्र हि सर्व सामाजिक शास्त्रांची जननी आहे, संशोधन म्हणजे ज्ञानाचे घर आहे, समाजामध्ये सध्या नवनवीन समस्यांचा उदय होत आहे याची उकल आपणास असणे गरजेचे आहे, या समस्यांकडे आपले संशोधक म्हणून पाहणे काळाची गरज आहे. संशोधनाला सैद्धांतिकदृष्ट्या पाहून संशोधनाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून आपले विचार मांडणे गरजेचे आहे. यातून खर्या अर्थाने संशोधन प्रकल्प आणि संशोधन पेपर यास आपण न्याय देऊ शकतो. या सर्वांचा विचार विद्यार्थ्यांनी करणे क्रमप्राप्त आहे. असे मत दुसऱ्या सत्रात माजी विभाग प्रमुख प्रा. एम. एम. कांबळे यांनी संशोधन पेपर लेखन या विषयी सविस्तर माहिती देत असताना मांडले.
कार्याकार्माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे होते. शिक्षण घेत असताना संशोधकाचे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. यातून आपली विचाराची प्रगल्भता सिद्ध होण्यास मदत होते. तसेच समाजाला आणि कुटुंबाला आपल्या लेखनाचा फायदा होणे गरजेचे आहे. सध्याच्या युगामध्ये संशोधनाच्या माध्यमातून आपण विचार मांडत असतो. विचारांच्या माध्यमातून आपण जगापर्यंत पोहोचतो. पीएच. डी. करत असतांना सदर कार्यशाळेचा आपणास नकीच फायदा होईल, असे मत मा. प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मांडले.
कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी‌ आर. नागर्थवार यांनी केले. सूत्रसंचालन कु. प्रीती भिसे हिने केले तर आभार डॉ. सुशील कोरटे यांनी मानले. यावेळी प्रा. विशाल कांबळे, डॉ. अशोक बोगुलवार, डॉ. राजकुमार गीते, प्रा. राहुल कांबळे व प्राध्यापक-प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा