ICHMH51NEWS.IN
9921600800

CIS चषक २०२६ : सौ. गंगामाई विद्या मंदिर व समर्थ विद्या मंदिरचा दुहेरी मान — ‘बेस्ट चेस स्कूल’ किताब पटकावला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

CIS चषक २०२६ : सौ. गंगामाई विद्या मंदिर व समर्थ विद्या मंदिरचा दुहेरी मान — ‘बेस्ट चेस स्कूल’ किताब पटकावला

इचलकरंजी :
इचलकरंजी चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने केन चेस अकॅडमी, मास्टर चेस अकॅडमी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “CIS चषक २०२६” निमंत्रित जलद बुद्धीबळ स्पर्धेत शहरातील सौ. गंगामाई विद्या मंदिर आणि समर्थ विद्या मंदिर या दोन्ही शाळांनी उल्लेखनीय कामगिरी करत बेस्ट चेस स्कूल हा मानाचा किताब पटकावला.
सौ. गंगामाई विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांमध्ये ३री-४थी गटात हर्ष किशोर मादनाईक याने प्रथम क्रमांक मिळवत रोख १००० रुपये व शिल्ड मिळविली. इयत्ता १ली-२री गटात युगंधर चंद्रकांत कुंभार याने तृतीय क्रमांक, तर इयत्ता २री गटात ओजस कुमठेकर याने प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल व प्रमाणपत्र पटकावले. प्रज्ञा पोर्लेकर व तुषार रुगे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच शरिवा मगदूम, अरोही रंगाटे, अर्थव माळी, शिवरूद्र पाटील यांच्या एकत्रित कामगिरीमुळे शाळेला बेस्ट चेस स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समर्थ विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांमध्ये केदार सुकुमार चौगुले याने द्वितीय क्रमांक मिळवत ट्रॉफी व ५०० रुपये मिळविले, तर अद्वैत अभिजीत पोवार याने तृतीय क्रमांकासह ट्रॉफी व ३०० रुपये पटकावले. बेस्ट गर्ल म्हणून सोनल दीपक कुंभार हिने प्रथम क्रमांक मिळवत ब्राँझ मेडल व रोख पारितोषिक मिळविले. इयत्ता तिसरी गटात प्रसन्न मुरुदुंडे याने प्रथम, वल्लभ बाबर याने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता दुसरी गटात स्वराज सागर काटकर याने द्वितीय, तर अनुष्का कलागते हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. इरा सुतार, शर्विल लोकरे, युवराज कुंभार, जुई मत्तिकली यांच्या कामगिरीमुळे समर्थ विद्या मंदिरलाही बेस्ट चेस स्कूल ट्रॉफी मिळाली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बुद्धीबळ प्रशिक्षक सौ. रेशमा नलवडे मॅडम व रोहित पोळ सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. गंगामाई विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका छाया गवळी मॅडम आणि समर्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुगंधा चौगुले मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.
चेस स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक व केन चेस अकॅडमीचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा