इचलकरंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; विविध ठिकाणी अभिवादन
इचलकरंजी :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सागर सखाराम कांबळे (आरोग्य अधिकारी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. कार्यक्रमास शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद खुडे, सुदाम साळुंखे, सचिन साठे, अजित मिणेकर, अनिल कदम, मारुती कोरवी, गंगाधर माळी, अनिल पाच्छिंद्रे, चंद्रकांत मिस्त्री, अण्णा कांबळे, संदीप साबळे, दशरथ जावळे, सतीश कांबळे, ताजुद्दीन खतीब, रवींद्र पाटील, राजू किणेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळा, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल परिसरातील अर्धपुतळा तसेच हॉस्पिटलमधील प्रतिमेस महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, मागासवर्गीय समिती सभापती रुबन आवळे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, शिक्षण समिती उपसभापती पुनम माळी, नगरसेवक रवी रजपुते, राजू बोंद्रे, योगेश पाटील, अविनाश कांबळे, नगरसेविका प्रियांका इंगवले, मनिषा कुपटे, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, दिलीप मुथा, संतोष कुपटे, प्रमोद बचाटे, दत्ता मांजरे, सचिन माळी, मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, विजय राजापुरे, शहर अभियंता बाजीराव कांबळे, सहायक आयुक्त रामचंद्र कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सदाशिव जाधव, संभाजी पोवार, प्रतिभा चौगुले, संजय कांबळे, महेश बुचडे आदी उपस्थित होते.
समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली. शकील मुल्ला यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पांडुरंग पिसे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी आशा भोसले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास प्रसाद कुलकर्णी, अन्वर पटेल, नौशाद शेडबाळे, महंमद मुल्ला, शहाजी धस्ते, अशोक माने, पांडुरंग आगम, कुमार मिणचे, इकबाल पखाली, रमेश चचडी आदी उपस्थित होते.
तसेच श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रा. संगीता पाटील व प्रा. अनिल कुंभार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना कु. चोपडे यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार समजावून सांगितले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. त्रिशला कदम, प्रा. मनिषा गवळी, प्रा. प्रिया सुतार, प्रा. शाहीन फकीर, प्रा. निकिता बडे, प्रा. अनुराधा देशटवार, अनिल सुतार, पवन माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल नाईक यांनी केले तर आभार प्रा. प्रमिला सुर्वे यांनी मानले.
शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्थांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीत अभिवादन करताना सागर कांबळे,शशांक बावचकर,नगरसेवक संजय कांबळे व इतर
अभिवादन करताना महापौर उदय धातूंडे,आयुक्त पल्लवी पाटील व पदाधिकारी
समाजवादी प्रबोधिनी येथे अभिवादन करताना शकील मुल्ला,प्रसाद कुलकर्णी,पांडुरंग पिसे व इतर
आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात अभिवादन करताना प्रा त्रिशला कदम व शिक्षक वर्ग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










