मुख्य रस्त्याच्या कामाची महापौरांसह पदाधिकाऱ्यांकडून पाहणी,काम दर्जेदार करण्याच्या सूचना
इचलकरंजी :
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आमराई रोड या प्रमुख रस्त्याच्या कामाची महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या आणि स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मनपा अधिकारी व मक्तेदार उपस्थित होते. पाहणीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम दर्जेदार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियलची खात्री करून त्याची तपासणीही करण्यात आली.
सदर रस्ता इचलकरंजी शहरातील मुख्य वाहतूक मार्ग असल्याने काम उच्च गुणवत्तेचे आणि विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच संबंधित विभागांना खुदाई, पाईपलाईन किंवा इतर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
रस्त्याचे काम सुरू असताना शहरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अधिकारी व मक्तेदारांना करण्यात आल्या.
मुख्य रस्तेकामाची पाहणी करताना महापौर उदय धातूंडे,उपमहापौर अनिल डाळ्या,सतीश मुळीक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






