इचलकरंजीत हुंड्याच्या मागणीवरून साखरपुडा मोडला; चौघांविरुद्ध गुन्हा
इचलकरंजी:
लग्नासाठी १० लाख रुपये व पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत साखरपुडा मोडल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हुंडा प्रथेबाबत पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे.
याबाबत कु. सुफिया साहेबचाँद पटेल (वय २३, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी औरवाड येथे त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यासाठी फिर्यादी व तिचे नातेवाईक आरोपींच्या घरी गेले असता, आरोपींनी लग्न लावायचे असल्यास रोख १० लाख रुपये व पाच तोळे सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली.
फिर्यादी व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत ही मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मागणी पूर्ण न झाल्याने आरोपींनी साखरपुडा मोडून लग्नास नकार दिला. या प्रकारामुळे फिर्यादीची फसवणूक व मानसिक छळ झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी सलमान समिउल्ला पटेल, समिउल्ला सत्तार पटेल, परवीन समिउल्ला पटेल (सर्व रा. औरवाड) तसेच शिफा जुबेर पटेल (रा. उचगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोमीन करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




