ICHMH51NEWS.IN
9921600800

यंत्रमाग बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही-आ.राहुल आवाडे,मजुरीवाढीसाठी पॉवरलूम असोसिएशन मार्फत प्रयत्न करू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यंत्रमाग बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही-आ.राहुल आवाडे,मजुरीवाढीसाठी पॉवरलूम असोसिएशन मार्फत प्रयत्न करू

इचलकरंजी:
 खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नावर शनिवारी रात्री आंदोलन अधिक तीव्र झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी आ.राहुल आवाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत मजुरी प्रश्नात तातडीने लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी केली.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी कारखाने बंद करून प्रश्न सुटणार नसल्याचे सांगत, ज्या ट्रेडिंगधारकांकडून वैयक्तिक पातळीवर मजुरीवाढ दिली जात नाही त्यासंदर्भात पॉवरलूम असोसिएशनच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
मात्र मोर्चेकऱ्यांनी वैयक्तिक तोडगा नको, तर सर्व संबंधित घटकांची सार्वजनिक बैठक बोलावून मजुरीवाढीबाबत अधिकृत करार करण्यात यावा, अशी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे चर्चेदरम्यान काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
अखेर सर्व घटकांच्या प्रतिनिधींना एकत्र बोलावून चर्चेतून तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी माघार घेतली.
या बैठकीत प्रकाश आवाडे, बाळासाहेब कलागते,नंदकुमार लोखंडे,योगेश वाघमारे,शहाजी भोसले यांनी आपापली भूमिका मांडली. जवळपास तासभर या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी