ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत १२ मे पासून २१ मे पर्यंत मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला,  वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्याख्यात्यांचा सहभाग 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत १२ मे पासून २१ मे पर्यंत मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला,वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्याख्यात्यांचा सहभाग 

इचलकरंजी:
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे ‘मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आला आहे. व्याख्यानमालेचे हे ४८वे वर्ष असून या उपक्रमास तुळजाराम सुरचंद शहा यांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये दहा दिवसाच्या कालावधीत विविध क्षेत्रांमधील नामवंत वक्ते आणि कलाकार सहभागी होणार आहेत.
ह्या यावर्षीच्या व्याख्यानमालेसाठी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव, शुभम डायनिंग, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, दि लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसर्स लिमिटेड,
गुरुकुल शिक्षण समूह अ.लाट इचलकरंजी, लक्ष्मीदत्त मंडप प्रा. लिमिटेड इचलकरंजी,  बालमुकुंद रामाकिसन चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी, डी. एम. कस्तुरे चॅरिटेबल फाउंडेशन, किरण गॅस एजन्सीज, चौगुले डेअरी प्रॉडक्ट्स आणि कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक यांचे सहकार्य लाभले आहे.
व्याख्यानमालेच्या उदघाटनाच्या दिवशी मंगळवार दिनांक १२ मे रोजी प्रसिद्ध लेखक आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ अतुल कहाते, पुणे यांचे ‘ए आय चे अद्भुत विश्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार १३ मे रोजी पर्यावरण अभ्यासक आणि कोकणी रान माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसाद गावडे यांचे ‘ज्यांनी निसर्ग जपला तेच वंचित का’ या विषयावर व्याख्यान होईल. गुरुवार १४ मे रोजी शिवचरित्र व मराठा इतिहासाचे अभ्यासक सुनील नायर, ठाणे यांचे ‘छ. शिवराय… केवळ इतिहास नाही तर वर्तमानातील प्रेरणा’ या विषयावरील व्याख्यान होईल तर शुक्रवार दिनांक १५ मे रोजी प्रसिद्ध कथाकथनकार रेखा मुंदडा, धुळे यांचे ‘कथाकथन’ होणार आहे.
शनिवार दिनांक १६ मे रोजी प्रसिद्ध लेखक आणि जलदिंडीचे प्रवर्तक तसेच योग व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विश्वास येवले, पुणे यांचे ‘जलयोग’ या विषयावर व्याख्यान होईल. रविवारी १७ मे रोजी डीआरडीओ मधून निवृत्त व ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, पुणे यांचे ‘स्वदेशी शस्त्र सज्जतेची गरुड झेप’ या विषयावर व्याख्यान होईल तर सोमवार दिनांक १८ मे रोजी प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते इंद्रजित भालेराव, परभणी यांचे ‘शोध शेती संस्कृतीचा’ या विषयावर व्याख्यान होईल. व्याख्यानमालेत मंगळवार १९ मे रोजी साधना साप्ताहिकाचे संपादक व अभ्यासू पत्रकार विनोद शिरसाठ, पुणे यांचे ‘लोकशाहीच्या चौथ्या व पाचव्या स्तंभाची युती आवश्यक’ या विषयावर व्याख्यान होईल.
बुधवार दिनांक २० मे रोजी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या अनवट साहित्यावर आधारित ‘अपरिचित पूलं’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध रंगकर्मी व कलावंत चंद्रकांत काळे, डॉ. सतीश आळेकर आणि गिरीश कुलकर्णी यांचा सहभाग आहे तर संगीत साथ अपूर्व द्रविड आणि दीप्ती कुलकर्णी करणार आहेत. समारोपाच्या दिवशी प्रसिद्ध लेखिका व आहारतज्ज्ञ आणि मानसशास्त्र तज्ज्ञ अमृता देशपांडे, पुणे यांचे ‘रोजचा आहार, रोजचे मानसशास्त्र’ या विषयावर व्याख्यान होईल. सदरची व्याख्यानमाला येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हॉल, मंगळवार पेठ, रिक्रिएशन सेंटरजवळ, इचलकरंजी येथे होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी