इचलकरंजी स्वातंत्र्यदिन विशेष
ताराराणी पक्ष-
ताराराणी पक्षाच्या वतीने भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणातील समारंभात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, सुनिल पाटील, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, रमेश कबाडे, सौ. उर्मिला गायकवाड, संजय केंगार, नरसिंह पारिक, महावीर कुरुंदवाडे, अरुण निंबाळकर, सतीश मुळीक, श्रीरंग खवरे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ताराराणी पक्षाचे पदधिकारी, सदस्य व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-
७८ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार कार्यालयामध्ये झेंडावंदन संपन्न झाला याचे प्रमुख पाहुणे म्हणून मँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे बोलत असताना इचलकरंजी शहराच्या पाणीप्रश्नी जनतेने रस्त्यावर येऊन सरकारला जाग आणली पाहिजे तसेच या विधानसभेला नविन आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देऊन त्या उमेदवार निवडून आणण्याचे जबाबदारी घेऊ आणि ती सर्व जबाबदारी सर्वांनी पार पाडुया असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शहर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे, कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील, अभिजीत रवंदे,नितीन कोकणे, प्रधान माळी,अमरजीत जाधव,अब्राहम आवळे,महिला अध्यक्ष माधुरीताई सातपुते,युवती अध्यक्ष प्रियदर्शनी बेडगे असे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजवदंन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना
पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर यांनी स्वातंत्र लढ्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विठ्ठलराव डाके रहमान खलिफा,महादेव कांबळे,
यांच्यासह इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष मीना बेडगे,इचलकरंजी शहर उपाध्यक्ष शशिकांत देसाई बाबासाहेब कोतवाल इचलकरंजी शहर भटके विमुक्त सेल चे अध्यक्ष रवि वासुदेव, इचलकरंजी विधानसभा एन एस यु आय चे अध्यक्ष रविराज पाटील, इचलकरंजी शहर कामगार आघाडीचे अध्यक्ष सचिन साठे, सोशल मीडिया चे शिवा चव्हाण, इचलकरंजी शहर काँग्रेस कार्यकारणीचे नंदकिशोर जोशी
राजन मुठाणे,अजित मिनेकर,नामदेव कोरवी, प्रवीण फगरे,राजू किणेकर,दिलीप भुई,अरविंद धरणगुत्तीकर प्रशांत लोले,अनिता बिडकर,विद्या भोपळे,सावित्री हजारे,शबाना नदाफ अरुण गिते,तोसिफ लाटकर,गोविंदा आढाव,प्रवीण पाटील बाबर,सुमित यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी महानगरपालिका
इचलकरंजी
महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते राजाराम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा*
इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने गुरुवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते तसेच अति.आयुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाराम स्टेडियमवर मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
आजच्या ध्वजारोहण समारंभासाठी महानगरपालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक, राजर्षी शाहू हायस्कूल, डि.के. ए. एस. सी. महाविद्यालय,आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल, गंगामाई हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, व्यंकट राव हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूल एन.सी.सी., एम.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सन २०२४ या वर्षामध्ये महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच ‘ हर घर तिरंगा’ उपक्रमा अंतर्गत इचलकरंजी शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी प्रा.संतोषी जावीर, प्रा.प्रमिला सुर्वे, प्रा.शेखर शहा, प्रा.राहुल बूनांद्रे, शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, व्ही.एस.मुलाणी, सरस्वती हायस्कूलचे संजय परीट, जितेंद्र कुलकर्णी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा मेघा चाळके, माजी नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे, संतोष शेळके, वित्त व लेखा अधिकारी विकास खोलपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा.आयुक्त केतन गुजर, सहा. आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार विद्युत अभियंता संदीप जाधव, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, यांचे सह शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, माजी सैनिक, महानगर पालिकेचे विभाग प्रमुख, शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, महानगर पालिका निवृत्त अधिकारी कर्मचारी, नागरिक, विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजवादी प्रबोधिनी.
समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बजरंग लोणारी यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलतांना बजरंग लोणारी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा ,स्वातंत्र्याची विचारधारा ,स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारलेली राज्यघटना आणि त्यात अंतर्भूत असलेली सर्वांगीण समानतेकडे नेणारी मूल्ये यांचे महत्त्व स्पष्ट केले . तसेच गेल्या काही वर्षात या मूल्यांची जातीय व धर्मांध विचारधारांनी केलेली पद्धतशीर हेळसांड याचा उल्लेख केला. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वजांनी मिळविलेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर राज्यघटनेतील मूल्य व्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी शशांक बावचकर, प्रा .रमेश लवटे, दयानंद लिपारे,उज्ज्वला जाधव, शकील मुल्ला, अशोक माने,गजानन पाटील, भिमराव नायकवडी आदींसह अनेकजण उपस्थित होते.स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पांडुरंग पिसे यांनी केले.
आयडियल इंग्लिश स्कुल
युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी संचलित, आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मा. श्री. अविनाश निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, सादर केले. नर्सरी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची भाषणे पार पडली. अवघे वातावरण तिरंगामय झाले होते.
प्रमुख पाहुणे मा. अविनाश निकम आपल्या भाषणात बोलत असताना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रथमतः त्यांनी अधिकार आणि कर्तव्य याबाबत माहिती दिली. जे अधिकार आहेत ते आपल्याला मिळतच आहे, फक्त आपण चांगले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. उदाहरणार्थ – घटनेने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, तो आपण घेत आहोत पण यासोबत आपण आपले कर्तव्य निभावले पाहिजे. अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्य या तिघांचा मेळ साधला गेला तर आपण एक उत्तम नागरिक घडू शकतो,असेही ते म्हणाले. भाषण केलेल्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक नाव घेऊन त्यांनी कौतुक केले .
आदरणीय चेअरमन किरण माळी सर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले ७८ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. अबाल वृद्धांना अभिमान वाटावा असा आजचा दिवस प्रथमत : त्यांनी बांगलादेशमध्ये चालत चालू असलेल्या सद्यस्थितीच्या हिंसाचाराचे उदाहरण दिले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. हे युद्ध धर्म आणि भाषा यासाठी झाले होते त्यामुळे पाकिस्तानने बांगलादेश दोन्ही देश वेगळे झाले. देशाचा धर्म नसतो तर देशातील लोकांचा धर्म असतो. परंतु काही देश धर्माचा देश म्हणून स्वतःला संबोधतात.
आपण भाग्यवान आहोत कारण आपला देश संविधानानुसार चालतो. घटनेने आपल्याला अधिकार आणि कर्तव्य दिलेली आहे. त्यामुळेच एक चहावाला सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान झाले, ते नाव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आज आपण आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेऊया, असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
भाषणानंतर इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थिनींनी चंद्रयान प्रस्थान यावर आधारित नाटक सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूह नृत्य सादर केले. या समयी चेअरमन किरण माळी सर, प्रमुख पाहुणे श्री. अविनाश निकम सर, प्रशासक माधवी होसमणी मॅडम, मुख्याध्यापिका प्रा.सौ.राधिका भिसे मॅडम, शिक्षक वृंद,विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – कु. रसिका माळी ( इयत्ता नववी ) / मृणाली हांडे (इयत्ता आठवी )
स्वागत- कु. अंजली नाईक (इयत्ता आठवी )
सहाय्यक – कु. भक्ती कदम (इयत्ता नववी )
आभार प्रदर्शन – कु. अंजली कराळे( इयत्ता
सहावी ) या विद्यार्थिनींनी केले.
अशा तऱ्हेने 78 वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात,आनंदात पार पडला.
विकास विद्या मंदिर व चौगुले बालवाडी गणेशनगर.
*इचलकरंजी* : विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माहेश्वरी सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्षा रेणू झंवर व राजश्री जाकोटीया यांच्या हस्ते भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना रेणू झंवर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य विषयक माहिती सांगितली व शाळेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांनी मराठी , हिंदी, इंग्रजी या भाषेतून आपली भाषणे सादर केली. यावेळी कवायत प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
माहेश्वरी संस्कृतिक ग्रुपच्या वतीने शाळेस भेट स्वरूपात देण्यात आलेल्या दोन फलकांचे अनावरण यावेळी घेण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी शाळेच्या महाव्यवस्थापिका स्मिता चौगुले,मार्गदर्शक दत्तात्रय देसाई, संचालक यश चौगुले, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मावळी सर यांनी केले.
चौगुले बालवाडी कोरोची

*कोरोची* : विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चौगुले बालवाडीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष वृषभजी छाजेड व इचलकरंजी शहराध्यक्ष गौतमजी मुथा यांच्या हस्ते भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गौतमजी मुथा बोलताना विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य विषयक माहिती सांगितली व शाळेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांनी मराठी , हिंदी, इंग्रजी या भाषेतून आपली भाषणे सादर केली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून वृक्षारोपण करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी अमृतजी पारख, पारसजी वागोनी , नरेंद्रजी सिंघवी, अशोकजी डेलाडिया , आप्पासाहेब कुडचे, शितल चौगुले, देवमोरे शाळेच्या महाव्यवस्थापिका स्मिता चौगुले,मार्गदर्शक दत्तात्रय देसाई, संचालक यश चौगुले, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना मेळवंकी यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







