डी.के.टी.ई. च्या इलेक्ट्रीकल विभागातील प्राची वरकल विद्यार्थ्यांनीची ऑस्ट्रेलिया येथे ९० लाख शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी निवड
इचलकरंजी ता. १६ ऑगस्टः डी.के.टी.ई. च्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील प्राची वरकल या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्ससाठी ‘युनिर्व्हर्सिटी ऑफ सिडनी, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे. विशेष म्हणजे तिला सुमारे ९० लाख रुपयांची शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासना मार्फत मिळालेली आहे. डीकेटीईची विद्यार्थीनी प्राची वरकल हीला मिळालेले हे यश उल्लेखन्नीय आहे. भारतातून अनेक नामांकित संस्थेतून या विद्यापीठात विद्यार्थ्यांची निवड झाली असून या नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये डीकेटीईची विद्यार्थीनीचा सहभाग हा कौतुकास्पद आहे.
प्राची ने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणा-या जीआरई, टोफेल परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणा-या समकक्ष परिक्षेसाठी डीकेटीईच्या करिअर गायडन्स सेलच्या वतीने वेळोवेळी तज्ञ प्राध्यापकांचे गेस्ट लेक्चरचे आयोजन केले जात असते यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी फायदा होत असतो. डीकेटीईमध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त लॅब्ज व संशोधनात्मक शैक्षणिक वातावरण यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी चालना मिळत आहे.
या सर्व शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्राचीला डीकेटीईमधील सर्व शैक्षणिक सोयी सुविधा व उपक्रम तसेच प्राध्यापकांचे सखोल मार्गदर्शन मिळाले यामुळेच हे सर्व यश प्राप्त झाले अशी भावना प्राची हीने व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांनीस भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. प्राचीला संस्थेच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.आर.एन.पाटील व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईची विद्यार्थीनी प्राची हिचा सत्कार करीत असताना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ सपना आवाडे व इतर मान्यवर.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800