ICHMH51NEWS.IN
9921600800

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला इचलकरंजीत पाठिंबा; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला इचलकरंजीत पाठिंबा; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

इचलकरंजी : नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकारांप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला इचलकरंजीत संविधान परिवार आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला. प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन सादर केले.

संविधान परिवारचे अशोक वरुटे, रोहित दळवी आणि किरण माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी किरण माळी यांनी सांगितले की, लोकशाही मार्गाने सुरू असलेले सोनम वांगचुक यांचे उपोषण सरकारने दवाखान्यात हलवून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असून, या कृतीचा निषेध करण्यात आला.

अशोक वरुटे यांनी केंद्र सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणात सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्यावर ठोस आणि कृतीशील निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक रोहित दळवी यांनी या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद बोंद्रे यांनी देशभरातील आंदोलन करणाऱ्या सर्व पक्ष आणि संघटनांशी केंद्र सरकारने तातडीने चर्चा सुरू करावी, अशी मागणी केली. महेश खांडेकर यांनी देशातील युवाशक्ती आणि पर्यावरणाच्या हिताचे संरक्षण करण्याची सरकारची संविधानिक जबाबदारी असून आंदोलकांच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य कराव्यात, असे सांगितले.

या आंदोलनात निलेश बनगे, नम्रता कांबळे, साद चांदकोटी, दामोदर कोळी, रोहित पालके, राजेश नगरकर, शरद वास्कर, अनुभव शिक्षण केंद्रचे जिल्हा कार्याध्यक्ष स्नेहल माळी, अमोल पाटील, अनिकेत पोवार, आदित्य धनवडे, ऋतिक, पुनम बनसोडे, महेश वजीरे, अमित कोवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

निवेदन देताना संविधान परिवाराचे कार्यकर्ते

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा