डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये निवड; ७.२ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज
इचलकरंजी :
डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या १४ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ४.५ लाख ते ७.२ लाख इतके आकर्षक वेतन पॅकेज मिळाले असून, संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंटमधील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील टीसीएस निंजा-डिजिटल भरती प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा व अंतिम मुलाखतीनंतर डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती, नियोजनबद्ध प्रशिक्षण, अॅप्टिट्यूड टेस्ट, कोडिंग, तांत्रिक मुलाखती, ग्रुप डिस्कशन, सॉफ्ट स्किल्स आणि मॉक इंटरव्ह्यू यांचा या यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे संस्थेने सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागातील अजिंक्य बोंडगे, साहिल मालवी, साक्षी पाटील, सुदेश कुंभार, मंथन घोरपडे, माज भडगांवकर, सानिका मिरजे; एआय-अँड-एमएल विभागातील विजय खापरे, वैदही वजे, अनुष्का करडे, श्रेयश मालानी, रविना रावळ; ईटीसी विभागातील प्रज्ञा उपाध्ये आणि एआय-अँड-डेटा सायन्स विभागातील सोहल ढवळे यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख, टीपीओ प्रा. जी. एस. जोशी तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टीसीएस मध्ये निवड झालेले विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





