कन्या महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात; विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन
इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पीएसएन सप्लाय चेन सोल्यूशन्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात पार पडला.
प्रभारी प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ प्राध्यापिका सौ. संगीता पाटील यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाचे समन्वयन वाणिज्य विभागप्रमुख तथा प्लेसमेंट सेल समन्वयक प्रियांका साळोखे यांनी केले. विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्राची माहिती देणे आणि नामांकित लॉजिस्टिक्स व सप्लाय चेन कंपन्यांशी जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएसएन सप्लाय चेन सोल्यूशन्सचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर नंदकिशोर बोंगे यांनी करिअर नियोजन, उद्योगक्षेत्रातील संधी आणि आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. अकाउंट्स अँड रिकव्हरी मॅनेजर योगिनी नेवरेकर यांनी फॉक्सेन कंपनीतील रोजगाराच्या संधी, पात्रता, वेतन, सुविधा आणि कामाचे स्वरूप याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीन फकीर यांनी केले, तर इतिहास विभागप्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी आभार मानले. यावेळी कंपनीचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




