प्रबोधन वाचनालयास ग्रंथपालदिनी विद्यार्थी – विद्यार्थिनींची अभ्यास भेट
इचलकरंजी ता.१०
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती अर्थात भारतीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाला डी. के. ए.एस.सी कॉलेज मधील मराठी विषयाच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी अभ्यास भेट दिली. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.प्रो.डॉ. सुभाष जाधव यांचे हस्ते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा.रोहित शिंगे आणि डॉ.रामा रोकडे यांनी डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे भारतीय ग्रंथालय शास्त्रातील योगदान आणि विद्यार्थी दशेतील वाचनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.सौदामिनी कुलकर्णी व मानसी तगारे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रबोधन वाचनालयातील सर्व विभाग आणि कामकाजाबद्दलची सविस्तर माहिती दिली. यावेळी पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी संदर्भ विभागासह ग्रंथालयातील सर्व विभागातील पुस्तके हाताळली व नियतकालिके चाळली. त्यामुळे हा भारतीय ग्रंथपाल दिन एका वेगळ्या भूमिकेतून आणि उत्साही वातावरणात साजरा झाला. यावेळी प्रबोधन वाचनालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वाचन साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. सौदामिनी कुलकर्णी यांनी आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





