शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुण्यतिथीनिमित्त भव्य प्रभात फेरी
इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक व संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त इचलकरंजी शहरातील संस्थेच्या पाचही ज्ञानशाखांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रभात फेरी उत्साहात पार पडली. यामध्ये हजाराहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते सहभागी झाले.
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय, दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त आयोजनातून प्रभात फेरी काढण्यात आली.
डी.के.ए.एस.सी. महाविद्यालय येथे डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रभात फेरीस सुरुवात झाली. संस्थेच्या आजीव सेविका प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, प्राचार्य डॉ. चंद्रानी बागडी, मुख्याध्यापक श्री. ढेरे, मुख्याध्यापिका सौ. एस. व्ही. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रभात फेरी राजर्षी शाहू महाराज पुतळा, शिवतीर्थ, शंभूतीर्थ, राजाराम स्टेडियम, शिवाजीनगर पोलीस ठाणे, तांबे माळ मार्गे पंचवटी चित्रमंदिर येथून कन्या महाविद्यालयात पोहोचली. घोषणांनी व ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. एनसीसी व एनएसएसच्या कॅडेट्सनी नियोजनासाठी सहकार्य केले. समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





