प्रभाग समिती ‘अ’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय ‘अ’चे शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथील नूतन जागेत स्थलांतर करण्यात आले असून, या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी खासदार धैर्यशील माने व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नूतन कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित विविध सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असून, प्रशासकीय कामकाजातही नागरिकांना सुविधा मिळणार आहे. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी करून नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, महिला व बालकल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक व नगरसेविका तसेच महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रभाग समिती अ कार्यालयाचे उद्घाटन करताना खा.धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील,अध्यक्ष सुशांत कलागते व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







