अल्पवयीन मुलाच्या हाती हेवी ट्रक दिल्याप्रकरणी वडिलांविरुद्ध गुन्हा
इचलकरंजी : अल्पवयीन मुलगा वाहन चालविण्यास पात्र नसल्याची माहिती असतानाही त्याच्या ताब्यात हेवी ट्रक दिल्याप्रकरणी वडिलांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाकीर खान (रा. काजी कुआ तला, जि. रतलाम, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीर खान यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात MH 18 BG 9150 क्रमांकाचा हेवी ट्रक दिला होता. मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही तो ट्रक चालवित होता.
दि. 17 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 12 वाजता इचलकरंजी शहरातील पी.एन.जी. ज्वेलर्स ते पोतदार सराफी ज्वेलर्स रोडवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना अल्पवयीन मुलगा ट्रक चालविताना आढळून आला.
याप्रकरणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोहेकॉ विनायक मोहनराव औताडे यांनी फिर्याद दिली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोअं पाटील करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







