इचलकरंजीत महापालिकेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली उत्साहात
इचलकरंजी : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाप्रती अभिमानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (दि. १७) भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती आणि विविध संस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरातील प्रमुख मार्ग तिरंगामय झाले होते.
रॅलीस खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील व उपमहापौर अनिल डाळ्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा येथून रॅलीस प्रारंभ झाला. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. रॅली श्री शिवतीर्थ, श्री शंभुतीर्थ मार्गे महात्मा गांधी पुतळा येथे पोहोचली, तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, NCC, MCC, क्रीडापटू, फिटनेस क्लब, सामाजिक संस्था, युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, महिला व बालकल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, समाजकल्याण सभापती रुबन आवळे, नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
तिरंगा रॅलीत सहभागी आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील व नागरिक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







