इचलकरंजीत इनरव्हील क्लबतर्फे ‘शॉपिंग एक्स्पो २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी :
इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शॉपिंग एक्स्पो २०२६’ला अग्रसेन भवन येथे उत्साहात सुरुवात झाली. गेल्या २५ वर्षांपासून क्लबच्या माध्यमातून महिला महोत्सवाचे आयोजन करून महिलांच्या कला, कौशल्य व व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे गौरवोद्गार सौ. मोश्मी आवाडे यांनी काढले.
यावेळी इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७च्या चेअरमन सौ. वसुंधरा कोले प्रमुख उपस्थित होत्या. अग्रसेन भवन येथे २२ ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात सुमारे ७० स्टॉल्स सुबक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी इचलकरंजीकरांना उपलब्ध झाली आहे.
प्रदर्शनात सिल्व्हर ज्वेलरी, काश्मिरी साड्या, विविध प्रकारचे ड्रेसेस, बेडशीट, हर्बल उत्पादने, घरगुती उपकरणे, इमिटेशन साड्या, फॅन्सी बॅग, राखी, नमकीन-बिस्किट्स, डिजिटल वस्तू, गिफ्ट आयटम्स, ट्रेडिशनल व हँडलूम साड्या, चिल्ड्रन वेअर, सुगंधित अगरबत्ती आदी विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून नाडी परीक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रदर्शनादरम्यान दर तासाला लकी ड्रॉ व स्पॉट गेम्सचे आयोजन करण्यात आले असून विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. बंपर ड्रॉमध्ये लकी कपल्सना महाबळेश्वर येथील हॉटेल संगम एक्झिक्युटिव्ह येथे दोन दिवसांच्या मुक्कामाचे तसेच ग्रँड फॉर्च्यून बीकॉन हॉटेलमधील स्टेचे कूपन देण्यात येणार आहे. लकी विजिटर्सना आर. के. थिएटरमधील चित्रपटाची कपल तिकिटेही देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. मुग्धा शहा यांनी केले. प्रकल्पाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन सौ. पुनम मोहता यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ. श्रद्धा झंवर व सौ. मीनाक्षी तंगडी यांनी करून दिली. डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. वसुंधरा कोले यांनी इनरव्हील क्लबच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत महिलांना त्यांच्या उद्योगासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
आभार सौ. ईशा खंडेलवाल यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौ. स्नेहा मराठे यांनी केले. कार्यक्रमास रोटरीचे माजी गव्हर्नर अरुण भंडारे, संजय उरुणकर, पंकज कोठारी, सुनील यळरुटे, शितल उपाध्ये, बिना बगडिया, सौ. वैशाली लोखंडे, सुमती अग्रवाल, छाया भुतडा, सौ. सपना शहा, सौ. सीमा उरुणकर, प्रेमा मर्दा यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सदस्या व विविध महिला मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरवासीयांनी या शॉपिंग एक्स्पोचा लाभ घ्यावा, असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे करण्यात आले आहे.
एक्स्पोचा शुभारंभ करताना मोसमी आवाडे व इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







