कन्या महाविद्यालयात शैक्षणिक व प्रशासकीय कार्य परीक्षण उत्साहात
इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथील विद्या समितीच्या संस्थांतर्गत पथकाकडून येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाची शैक्षणिक व प्रशासकीय कार्य तपासणी नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी परीक्षण समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव (आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर), समिती सदस्य प्रा. डी. ए. पवार, प्रा. डॉ. ए. जी. सोनवले व वरिष्ठ लिपिक व्ही. पी. देसाई यांचे स्वागत केले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सामाजिक व विशेष उपक्रमांची माहिती विभागप्रमुखांनी समितीसमोर सादर केली. गतवर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे समिती सदस्यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
प्रा. डी. ए. पवार यांनी संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक ध्येयधोरणानुसार वाटचाल करण्याचे आवाहन केले. नॅक मूल्यांकनाच्या धर्तीवर विविध उपक्रम राबविणे तसेच विद्यार्थीकेंद्रित व आऊटकम बेस्ड एज्युकेशनवर भर देण्याचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी प्राप्त सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी आगामी शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्रा. वर्षा पोतदार, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले. यावेळी सर्व गुरुदेव कार्यकर्ते, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
समितीचे स्वागत करताना प्रा.डॉ.श्रुती जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







