ICHMH51NEWS.IN
9921600800

संग्राम चाैकातील जुनी तालीम व व्यायामशाळा अद्ययावत करावी नगरसेवक चंद्रकांत शेळके यांची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संग्राम चाैकातील जुनी तालीम व व्यायामशाळा अद्ययावत करावी
नगरसेवक चंद्रकांत शेळके यांची मागणी

इचलकरंजी-
शहराच्या क्रीडा व व्यायाम संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधील संग्राम चाैकातील जुन्या तालीम व व्यायामशाळेचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक चंद्रकांत शेळके यांनी आमदार राहुल आवाडे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे. त्याचबराेबर  गणेशाेत्सवाच्या  पार्श्वभूमीवर  हत्ती चाैक व संग्राम चाैक याठिकारी बंच केबल टाकण्याची माणी  केली आहे.
संग्राम चाैक परिसरातील तालीम जुन्या काळातील असून अनेक वर्षांपासून युवकांना व्यायाम व शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे केंद्र म्हणून ओळखली जाते. तत्कालीन नगराध्यक्ष श्रीपतराव वडींगे यांच्या माध्यमातून  ही तालीम उभी राहिली हाेती. मात्र, काळानुरूप बदलणाèया गरजा लक्षात घेता तालीम व व्यायामशाळेतील पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या तालमी तून न अनेक नामांकित मल्ल तयार झाले असून त्यांनी  शहराच्या नांवलाैकिकात माेलाची भर घातली आहे. आजच्या माेबाईलच्या जमान्यात तरुण पिढीला माे हजालातून बाहेर काढून त्यांना  मैदानी खेळाकडे नेण्याची गरज आहे. त्याचदृष्टीने अद्ययावत व्यायामशाळा उपलब्ध झाल्यास परिसरातील युवकांना शारीरिक तंदुरुस्तीबराेबरच विविध क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठीही माेठी मदत हाेणार आहे.
शहरातील पारंपरिक तालमींचे जतन करतानाच त्यांना आधुनिक सुविधांची जाेड देणे आवश्यक असल्याचे शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संग्राम चाैकातील जुन्या तालीम व व्यायामशाळेच्या अद्ययावतीकरणासाठी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी भागातील नागरिक, खेळाडू यांच्यातून हाेत आहे. यावेळी  शहानुर सावळगी, प्रवीण टेके, मनीष मेटे उपस्थित हाेते.

आमदार राहुल आवाडे यांना निवेदन देताना नगरसेवक चंद्रकांत शेळके व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा