ICHMH51NEWS.IN
9921600800

जिल्हास्तरीय झिम्मा-फुगडी स्पर्धेत सोनचाफा ग्रुप प्रथम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हास्तरीय झिम्मा-फुगडी स्पर्धेत सोनचाफा ग्रुप प्रथम

इचलकरंजी :

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अँन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित जिल्हास्तरीय झिम्मा-फुगडी स्पर्धा दाते मळा येथील रोटरी श्रीमती सोनीदेवी रा. बाहेती सेवा केंद्रात उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन सौ.मौश्मी राहुल आवाडे यांच्या हस्ते झाले.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच पारंपरिक खेळ व महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने रोटरीतर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेला कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषा, झिम्मा-फुगडी, लोकनृत्य आणि विविध लोकपरंपरांचे सादरीकरण हे स्पर्धेचे आकर्षण ठरले.

परीक्षक सुजाता गोडसे व दीपाली फडके यांनी परीक्षण केले. स्पर्धेत सोनचाफा ग्रुप, इचलकरंजीने प्रथम, नागनाथ ग्रुप, सोनाळीने द्वितीय, ऐशप्रिया अकॅडमी, चिपळूणने तृतीय, तर फ्रेंडशिप कॉर्नर, इचलकरंजीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी असिस्टंट गव्हर्नर सौ. यास्मिन मनेर यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष पंकज कोठारी, सेक्रेटरी सुनील यळरुटे, रोटरी अँन्सच्या अध्यक्षा सौ. वैशाली कोठारी, सेक्रेटरी सौ. अर्चना दबडे, प्रोजेक्ट चेअरमन सौ. मीनाक्षी तंगडी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. शुभांगी माळी यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अँन्सतर्फे आयोजित जिल्हास्तरीय झिम्मा-फुगडी स्पर्धेवेळी सौ. मौश्मी आवाडे मार्गदर्शन करताना. तसेच प्रथम क्रमांक पटकावलेल्या सोनचाफा ग्रुपसोबत रोटरी अँन्सचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

सत्ताधारी नगरसेवकांचाच महापालिका प्रशासनावर हल्लाबोल! कचऱ्याचे ढीग, पाणीपुरवठ्याचा बोजवारा; उपमहापौरांसमोर तक्रारींचा पाऊस,प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सत्ताधारी बदनाम; स्वच्छता न सुधारल्यास कारवाईचा इशारा

विनापरवाना ऑपरेटर बदलल्याने जैववैद्यकीय कचरा प्रकल्प बंदचे आदेश, कचरा कोल्हापुरातील प्रक्रिया केंद्रात पाठवण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश,महापालिका प्रशासनाचा नियमबाह्य कारभार चव्हाट्यावर