ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिका बससेवेत ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना सवलत द्या सुभाष मालपाणी यांची अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका बससेवेत ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना सवलत द्या

सुभाष मालपाणी यांची अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेत ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय मुला-मुलींना शासनाच्या नियमानुसार प्रवास भाड्यात सवलत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष मालपाणी यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इचलकरंजी हे औद्योगिक व वस्त्रोद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. शहरातील विविध उद्योग, व्यवसाय तसेच नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक दररोज शहरात ये-जा करतात. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा मोठा समावेश आहे. सध्या महापालिकेची बससेवा सुरू झाली असली तरी प्रवासभाडे अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थी बससेवेपासून दूर राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाच्या नियमानुसार संबंधित प्रवर्गांना बस प्रवासात सवलत दिल्यास शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात महापालिका बससेवेचा वापर करतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळण्याबरोबरच बससेवेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असा दावा मालपाणी यांनी केला आहे.

याबाबत योग्य तो निर्णय घेऊन प्रस्ताव महासभेसमोर मांडावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी हे निवेदन अतिरिक्त आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

सत्ताधारी नगरसेवकांचाच महापालिका प्रशासनावर हल्लाबोल! कचऱ्याचे ढीग, पाणीपुरवठ्याचा बोजवारा; उपमहापौरांसमोर तक्रारींचा पाऊस,प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सत्ताधारी बदनाम; स्वच्छता न सुधारल्यास कारवाईचा इशारा

विनापरवाना ऑपरेटर बदलल्याने जैववैद्यकीय कचरा प्रकल्प बंदचे आदेश, कचरा कोल्हापुरातील प्रक्रिया केंद्रात पाठवण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश,महापालिका प्रशासनाचा नियमबाह्य कारभार चव्हाट्यावर