ICHMH51NEWS.IN
9921600800

स्वच्छता ही सेवा २०२४ उपक्रमा अंतर्गत २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत पर्यावरण पूरक वस्तू व पदार्थ यांची विक्री

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छता ही सेवा २०२४ उपक्रमा अंतर्गत २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत पर्यावरण पूरक वस्तू व पदार्थ यांची विक्री
इचलकरंजी
              शासन निर्देशानुसार  संपूर्ण राज्यात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छ भारत अभियानास दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘ स्वच्छता ही सेवा २०२४’  या अभियानाची अंमलबजावणी विविध उपक्रमांद्वारे करणेत येत आहे.
          या उपक्रमांतर्गत शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक वस्तू व पदार्थ यांची विक्री करण्यात येणार आहे. या वस्तू ह्या सर्व महिलांनी तयार केलेल्या असणार आहेत.  सदरच्या वस्तू
आणि पदार्थ यांच्या विक्रीसाठी
दि. २४ सप्टेंबर पासून २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत घोरपडे नाट्यगृह या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
     तरी या उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा आणि सदर उत्पादनांच्या खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील आणि आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा