ICHMH51NEWS.IN
9921600800

हातकणंगले विधानसभेसाठी ताराराणी पक्षातर्फे जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हातकणंगले विधानसभेसाठी ताराराणी पक्षातर्फे जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर.
हातकणंगले:
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षातर्फे हेरले (ता. हातकणंगले) येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत तथा हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री जयवंत कुरणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासह चार जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार इचलकरंजीत मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर सोमवारी माणगांव येथे झालेल्या एका कार्यक्रमात हातकणंगले विधानसभेसाठी महिला उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
हेरले येथील जयश्री कुरणे या सातत्याने राजकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी पॉलिटिक्स या विषयात एम.ए. राज्यशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली आहे. त्या स्वत: क्षितीज सामाजिक संस्थेच्या संस्थापिका असून महिला राजसत्ता आंदोलन बेलापूरच्या पश्‍चिम महाराष्ट्र कोकण विभागाच्या विभागीय समन्वयक आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या पंचायत राज विभाग, हमारा संकल्प संस्था न्यू दिल्ली, जलजीवन मिशन अंतर्गत पृथ्वी संग्राम संस्था सांगली,  कोल्हापूर जिल्हा रिषद ग्रामपंचायत विभाग, आयएसडी न्यू दिल्ली राजकीय विकास नेतृत्व अंतर्गत ट्रेनर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यशदा ट्रेनिंग सेंटरच्या ग्रामपंचायत मॉड्युल विशेषतज्ञ, कौटुंबिक हिंसाचार समुपदेशन केंद्रात कार्य केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अग्रेसर आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा