जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे यश
शासकीय शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत नेहरू चषक हॉकी स्पर्धा १५ वर्षाखालील गटामध्ये इचलकरंजी महानगरपालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ च्या मुलांच्या टीमने विजेतेपद पटकावले.
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रीय हॉकी खेळाडू मा.विजय पाटील,क्रीडा अधिकारी शेटे साहेब, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार सर व क्रीडा प्रमुख उपस्थित होते.सर्वानी खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व इस्लामपूर येथे दि.19 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







