ए जे सोशल वेल्फेअर फौंडेशनतर्फे युवा संवाद २०२४ चे रविवारी आयोजन.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील ए.जे.सोशल वेल्फेअर फौंडेशनतर्फे युवा संवाद २०२४ पर्व १ चे आयोजन रविवार २२ सप्टेंबर २०२४ रोजी फॉर्च्युन मल्टिप्लेक्स येथे करण्यात आल्याची माहिती फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अबोली जिगजीनी यांनी दिली.
एकविसाव्या शतकात युवक युवतींना वाटचाल करताना समोरील आव्हानाचा सामना कसा करावा याबाबत विविध नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.यातुन समाज जागृतीचे महत्वपूर्ण कार्य फौंडेशनच्या माध्यमातून घडत आहे.
परिसंवादासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार असुन त्यामध्ये रोहित दादा आर. आर.पाटील सदस्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,सौ शोमिका महाडिक,भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,डॉ. महेश थोरवे शैक्षणिक प्रसारक नियोजन, निष्पादन तज्ञ सामाजिक कृतिवादी कार्यकर्ता उद्योजक साहित्यिक आणि राजकारणी. ऍडव्होकेट कोमलताई अजय साळुंखे प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी बहुजन परिषद. सौ राणी बाळासाहेब पाटील सरपंच भुयेवाडी व राज्यस्तरीय व्याख्याता यशदा पुणे,ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर युवा कीर्तनकार व युवा व्याख्याते, श्री रवी जावळे संस्थापक अध्यक्ष माणुसकी फौंडेशन, ह.भ.प प्रथमेश इंदुलकर युवा कीर्तनकार व युवा व्याख्याते,पैलवान मारुती जमदाडे महान भारत केसरी,उपमहाराष्ट्र केसरीऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन, पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी जवळ २४ नॅशनल गोल्ड मेडलिस्ट,अथर्व राऊत इन्फ्ल्युएंसर आणि व्हिडिओ क्रिएटर,श्री गणेश नायकुडे संस्थापक अध्यक्ष गुरुकुल शाळा गुरुकुल अकॅडमी, राज कोरगावकर संस्थापक फेथ फाउंडेशन,प्रसाद सपकाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, याबरोबर भरत मोहिते,रितिक जोशी,आर जे सुमित आदि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.हा कार्यक्रम फॉरचुन सिनेप्लेक्स येथे रविवार 22 924 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या सत्रात चालणार आहे.
युवक युवतींसाठी नोंदणी शुल्क दोनशे रुपये असून यामध्ये सहभाग प्रमाणपत्र,ओळखपत्र,नोटपॅड,पेन, एक वेळ चहा,नाष्टा व भोजनाचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी फॉरचून सिनेप्लेक्स शहा ग्रुप तसेच कोरगावकर ग्रुप हे सहप्रायोजक असून गुरुकुल स्कूल अकॅडमी चे विशेष सहकार्य लाभले आहे त्याचबरोबर भरत कन्स्ट्रक्शन व माणुसकी फाउंडेशन यांचे सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त योग्य वतीने नोंदणी करावी असे आवाहन फौंडेशनच्या अध्यक्ष अबोली जिगजिनी यांनी केले असून खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
9075551712,9834584247 ,7757086024,7397937128

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800