ICHMH51NEWS.IN
9921600800

अनंत चतुर्दशीची २६ तास मिरवणूक.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अनंत चतुर्दशीची २६ तास मिरवणूक.

इचलकरंजी
इचलकरंजी येथे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणारी अनंत चतुर्दशीची मिरवणूक २६ तास चालली.पंचगंगा नदीवर पोलीस बॉईज यांच्या ११.४५ वाजता गणेश विसर्जननाने मिरवणुकीची सांगता झाली.
पोलीस प्रशासन,महापालिका,महावितरण यांच्या सर्वच कर्मचाऱ्यानी अखंड मेहनत घेत मिरवणूक शांततेत पार पाडली.
डॉल्बीचा दणदणाट व हिडीस नृत्य व गाण्यात मिरवणूक सुरू होती.शहरात पोलीस कर्मचारी कानात कापूस घालून कर्तव्य बजावत होते तर सामाजिक संघटनांनी कापूस वाटप उपक्रम राबविला.
इचलकरंजी शहरांमध्ये अनंत चतुर्थी दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात अगदी इचलकरंजीवासी तल्लीन झालेले होते. इचलकरंजी शहरांमध्ये आपल्या गणेश बाप्पांना निरोप देण्यासाठी येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर स्वागत व्यासपीठ उभारलेले होते.
यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,मुस्लिम समाज,मारवाडी युवा मंच,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,दैनिक राष्ट्रगीत,भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष,हिंदू एकता आंदोलन,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,शिवसेना शिंदे गट,वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट,सतेज फायटर्स, इचलकरंजी फेस्टिवल ताराराणी पक्ष, जय भवानी व्यायाम मंडळ जय शिवराय व्यायाम मंडळ असे व्यासपीठ उभा करून येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचा अध्यक्षांचा फेटा पान-सुपारी,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत होता. या विसर्जन मिरवणुकीला पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केलेली होती. डॉल्बी, ढोल ताशांच्या गजरामध्ये सर्व इचलकरंजी शहर गणेशमय झालेले पाहायला मिळाले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा