ICHMH51NEWS.IN
9921600800

राव अकॅडमीत प्रो कबड्डी पंच उजळणी शिबिराचे उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राव अकॅडमीत प्रो कबड्डी पंच उजळणी शिबिराचे उद्घाटन
कोल्हापूर-
खेळाच्या प्रचार आणि प्रसारात पंचांचं मोठं योगदान असतं असे उद्गार शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. आर. बी. पाटील यांनी काढले. येथील  कबड्डी राव अकॅडमी मध्ये प्रो कबड्डी च्या पंच उजळणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर. बी. शेडगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. संभाजी पाटील हे होते. यावेळी  द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ई प्रसाद राव हे उपस्थित होते.  कबड्डी राव अकॅडमीच्या व्यायाम शाळेच्या हॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिरात संपूर्ण भारतातून कबड्डी लीग साठी निवडलेले पंच सहभागी झाले आहेत
प्रो कबड्डी लीग 11 वे सत्र यावर्षी सुरू होत आहे.  यामध्ये काम करणाऱ्या सामना अधिकाऱ्यांचे चर्चासत्र व उजळणी वर्ग घेतला जातो. कोल्हापूरमध्ये राव कबड्डी अकॅडमी मध्ये सलग तिसऱ्या वर्षी याचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन आज आर. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आर. बी. पाटील म्हणाले की कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कबड्डी प्रशिक्षण केंद्र उभारले आहे याचा मला अभिमान आहे. अशा केंद्रातूनच केवळ खेळाडू तयार न होता स्पर्धेसाठी लागणारे पंच व इतर अधिकारी सुद्धा तयार होतील. त्यामुळे हल्लीच्या मार्केटिंगच्या युगात खेळाचा प्रचार आणि प्रसार चांगला होईल. त्याबद्दल अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडेगिरी यांना त्यांनी धन्यवाद दिले.
यावेळी डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी अकॅडमी बद्दल माहिती देताना  हे पंच उजळणी शिबिर पंधरा दिवस चालेल असे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब गावडे पंच मंडळाचे प्राचार्य डॉ. बाबासो उलपे, के. एस. माने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या उमा भोसले भेंडीगिरी, सौ ई प्रसाद राव भारतीय कबड्डी संघाच्या पंच मंडळाचे सदस्य विश्वास मोरे बेंगलोर साई चे माझी डायरेक्टर नटराजन आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अण्णासो गावडे यांनी केले.

फोटो- कबड्डी राव अकॅडमी मध्ये प्रो कबड्डी लीगच्या पंच उजळणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना  प्रा. आर. बी. पाटील शेजारी स्टार स्पोर्ट्स चे राहुल, संभाजी पाटील, आर. व्ही. शेडगे, विश्वास मोरे, प्रशिक्षक नटराजन तर दुसऱ्या छायाचित्रात कबड्डी राव अकॅडमीच्या व्यायाम शाळेच्या हॉलचे उद्घाटन अर. बी. पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी उमा भोसले,विश्वास मोरे, प्रा. संभाजी पाटील, आर. व्ही. शेडगे इ प्रसाद राव, रमेश भेंडीगिरी आदी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा