अर्चना मगदूम यांना नारी गौरव पुरस्कार प्रदान

इचलकरंजी:
सागर मध्यप्रदेश येथे अखिल भारतीय श्रमण संस्कृती महिला महासमिती यांचा नारी गौरव पुरस्काराने रांगोळी (ता.हातकणंगले ) येथील अर्चना मगदूम यांचा गौरव करण्यात आला
परमपूज्य निर्यापक श्रमाण सुधासागर महाराजजी यांच्या सानिध्यात दिगम्बरा महिला महासमिती च्या 29 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. भारतातून हजारो महिला उपस्थित होत्या. दिगंबर जैन महिला महा समिती ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संघटना आहे. दिगंबर जैन समाजाच्या राष्ट्रीय स्तरावर महिलांच्यासाठी ही संघटना विविध पातळीवर काम करीत असते. या संघटनेचे २९ वे अधिवेशन सागर मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.भारतातून एकूण आठ जणांना हा पुरस्कार देण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव अर्चना मगदूम यांची निवड करण्यात आली होती अर्चना मगदूम या गेली वीस वर्षे सामाजिक प्रबोधन त्याचबरोबर महिलाना संघटित करणे, युवतींना मार्गदर्शन करणे असे अनेक उपक्रम राबवीत असतात. विविध महिला संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजवर शेकडो कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शालेय व महाविद्यालय विद्यार्थी साठी वेगवेगळे शिबिरे घेऊन त्यांनी संस्कारक्षम युवती घडवण्यासाठी मोठा प्रयत्न केला आहे.
त्यानी महिला व युवतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. भारत शासन नीती आयोग सदस्यां अर्चना जैन, राजस्थान च्या श्रावीका श्रेष्टी आर के मार्बल च्या सुशीला पाटणी, महिला महासमिती च्या राष्ट्रीय अध्यक्षा शिला दोडिया यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







