जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा.अमोल येडगे यांची इचलकरंजी मतदारसंघास भेट.
इचलकरंजी
विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज इचलकरंजी मतदारसंघास भेट देऊन पाहणी केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ मोसमी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती .
या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी कोरोची येथील मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेच्या आणि मतदान केंद्रे सुस्थितीत ठेवणेच्या सूचना दिल्या.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंगरूम, मतमोजणी आणि मतदानासाठी आवश्यक साहित्य वाटप आणि स्विकारणेचे काम राजीव गांधी भवन येथे होणार असलेने सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करणेच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांना दिल्या.
त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले आणि सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज योग्य पद्धतीने होईल तसेच आचार संहितेचा भंग होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी असे आदेश दिले. तसेच २०१९ विधानसभा निवडणुक आणि लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाच्या तुलनेत येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष प्रयत्न करावेत अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले अधिकारी यांना दिल्या.
यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, उपायुक्त प्रसाद काटकर, तहसीलदार वंदना पवार, डॉ.सदाशिव जाधव यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









