ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ‘हुंकार हिंदुत्वाचा’ या विषयवार मा. श्री. सुरेश चव्हाणके यांचे सोमवारी व्याख्यान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ‘हुंकार हिंदुत्वाचा’ या विषयवार मा. श्री. सुरेश चव्हाणके यांचे सोमवारी व्याख्यान
इचलकरंजी
शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी यांच्या वतीने ‘हुंकार हिंदुत्वाचा’ या विषयावर माननीय श्री सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहामध्ये हे व्याख्यान होणार आहे. तर मोटरसायकल रॅली शिवतीर्थ येऊन सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. प्रमुख व्याख्याते श्री सुरेश चव्हाणके हे राष्ट्रीय विचाराचे व प्रखर हिंदुत्ववादी वक्ते म्हणून सर्वश्रुत आहेत. विविध स्तरावर अनेक ठिकाणी झालेल्या व्याख्यानात त्यांनी हिंदू जनजागृती   विषयावर परखड मते मांडलेली आहेत. तरुणांमध्ये खरी राष्ट्रभक्ती जागवणे व प्रस्थापित व्यवस्थेची चिकीत्सा करून समाजाला आरसा दाखवण्याचे राष्ट्रीय कार्य त्यांच्याकडून नेहमीच होत असते. त्याचबरोबर ते व्याख्याते मा. श्री. सुरेश चव्हाणके हे अतीउजवे हिंदुत्व वादी पत्रकार आहेत जे सध्याचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) आणि सुदर्शन न्यूज (सुदर्शन टीव्ही चॅनल लिमिटेड) चे मुख्य संपादक आहेत. तो बिंदास बोल या टीव्ही शोचा अँकर आहे. त्यांच्या राष्ट्रप्रेमाच्या विचार प्रसाराने व बेधडक विधानांनी ते कायम चर्चेत राहीले आहेत.त्याचबरोबर ते हिंदू – मुस्लिम धर्माच्या व्याख्यानामुळे राष्ट्रीय वक्ते बनले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तिच्या व्याख्यानाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी यांचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा