इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ. भाग्यरेखा पाटील
इचलकरंजी:
येथील आयजीएम रुग्णालयाचे अधीक्षक पदी डॉ. भाग्यरेखा पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शुक्रवारी रुग्णालयाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नंदकुमार बनगे सर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन रुग्णालयात स्वागत केले. डॉ. पाटील या स्त्रीरोग तज्ञ असून पूर्वी त्यांच्याकडे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचा पदभार होता. तर याआधी आयजीएम रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक पदाचा कार्यभार डॉ. नंदकुमार बनगे पाहत होते. रुग्णालयात वाढत्या रुग्णांना वेळीच व योग्य उपचार देण्यास प्राधान्य राहील असे डॉ. भाग्यरेखा पाटील सांगितले. यावेळी आरोग्य सेवा आयुक्तालय च्या सहा संचालक डॉ निलीमा सोनावणे मॅडम रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी सर रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम.चारुशिल्पा येमल मॅडम सहा अधिसेविका श्रीम.सीमा कदम मॅडम रुग्णालयातील सर्व रुग्णालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800