श्री नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
इचलकरंजी :
येथील श्री नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीची 2023-24 सालातील 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 18 ऑक्टो. 2024 रोजी संस्थेच्या श्री व्यंकटेश महाविद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
*” संस्थेच्या सर्व ज्ञानशाखांचे कार्य अत्यंत उत्कृष्टरित्या सुरू आहे. स्पर्धात्मक युगात शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी होत आहे. तसेच यंदा व्यंकटेश महाविद्यालयाला नॅक कमिटी कडून ए मानांकन मिळाल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे !”* अशा शब्दांत संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले
संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी बाबासाहेब वडींगे यांनी संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. *”संस्थेच्या विविध शाखांद्वारे शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे, अशाप्रकारे संस्थेची यशस्वीरित्या वाटचाल चालू आहे !”* असे आपल्या प्रास्ताविकातून मत मांडले.
विषय पत्रिकेतील सर्व विषयांचे वाचन पुरुषोत्तम पुराणिक यांनी केले याप्रसंगी सभेमध्ये टाळ्यांच्या गजरात सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून स्वर्गीय मदनलालजी बोहरा शेठजी व हरिषजी बोहरा शेठजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी नूतन विश्वस्त म्हणून श्रीनिवासजी बोहरा, कृष्णा बोहरा, उदय लोखंडे, बाबासाहेब वडिंगे, लक्ष्मीकांतजी पटेल, ॲड. सत्यनारायण ओझा, मारूती निमणकर, श्रीकांतजी चंगेडिया, अहमद मुजावर, महेश बांदवलकर, अशोक जोशी, रामकिशोर तिवारी, सुरेंद्रकुमार बांगड यांची टाळ्यांच्या गजरात बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नूतन विश्वस्तांचा सत्कार मान्यवर सभासदांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी अनेक सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सर्व शाखांचे शाखाप्रमुख, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आभार संस्थेचे विश्वस्त श्रीकांतजी चंगेडिया यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता प्रकाश शिंदे यांनी गायलेल्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







