ICHMH51NEWS.IN
9921600800

आरोग्य सेवा(शुश्रुषा) आयुक्तालय मुबंई च्या सहा. संचालक डॉ निलिमा सोनवणे यांची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास सदिच्छा भेट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य सेवा(शुश्रुषा) आयुक्तालय मुबंई च्या सहा. संचालक डॉ निलिमा सोनवणे यांची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास सदिच्छा भेट
इचलकरंजी:
इचलकरंजी नगरीतील नागरिकांच्या आरोग्यासाठी आधारवड बनत असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे मंजूर असलेल्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय सुरू करणेकामी आज आरोग्य सेवा (शुश्रूषा) आयुक्तालय मुंबई च्या सहा. संचालक डॉ निलीमा सोनवणे मॅडम यांनी आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास सदिच्छा भेट देऊन रुग्णालयातील सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी सर्व विभागांची पाहणी करून त्या विभागाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती घेतली. येत्या काळात इचलकरंजी नगरीतील मुला-मुलींच्यासाठी होणाऱ्या परिचर्या महाविद्यालयासाठी मार्गदर्शन केले रुग्णालयात सध्या कार्यरत असणाऱ्या सुविधांबाबत  स्वच्छतेबाबत
आणि कार्यरत असणाऱ्या सर्व रुग्णालयीन कर्मचारी यांचे कौतुक केले व अत्यंत समाधान व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नंदकुमार बनगे सर रुग्णालयाच्या नूतन वैद्यकीय अधिक्षक डॉ भाग्यरेखा पाटील मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी सर रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम चारुशिल्पा येमल सहा.अधिसेविका श्रीम.सीमा कदम रुग्णालयीन अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा