ICHMH51NEWS.IN
9921600800

नगरसेवक असतानाही संबंधाच्या जोरावर आमदारांसारखे काम-मदन कारंडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नगरसेवक असतानाही संबंधाच्या जोरावर आमदारांसारखे काम-मदन कारंडे

इचलकरंजी : सण २००४ पासून मंत्र्यांच्या माध्यमातून नगरसेवक असतानाही आमदारांसारखी कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे वारसा म्हणून नाही तर तीस वर्षाच्या कामातून, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच पक्षाने उमेदवारी दिली असून ही निवडणूक परिवर्तनाची विकासाची असल्याचा उल्लेख करत एक वेळ निवडून द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी केले.
              सोलगे मळा पाण्याची टाकी येथून नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर ऋतुराज कॉलनी, मधुबन कॉलनी ,संजय गांधीनगर, मथुरा नगर अशा विविध ठिकाणी प्रचार यात्रा करून सोलगे मळा येथे प्रचार यात्रेतून कॉर्नर सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते.
           ते पुढे म्हणाले  बारावी सीईटी परीक्षेत दहा मिनिटं कमी वेळ विद्यार्थ्यांना मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर माजी शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना भेटूया सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मंत्री टोपे यांनी परीक्षेला दहा मिनिटं वाढवून वेळ देत सुमारे सातशे रुपयांची फी माफ केली. त्यातून राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये वाचवण्याचे काम आपण केल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले. कॉर्नर सभेत काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल खंजीरे, माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, माजी सभापती शुभांगी माळी, अजित मामा जाधव,उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण, कॉम्रेड जीवन कोळी, मलकारी लवटे, गणेश जाधव, प्रकाश मोरबाळे,  नितीन कोकणे , माजी नगरसेविका सोनाबाई सोलगे, यशवंत झाडबुके, विलास कोकीटकर , संभाजी सूर्यवंशी, संजय सामानकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा